पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज पदी महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांची वर्णी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज पदी डहाणू पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया क्रिशन गोस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी केळवा सागरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
याआधी केळवा सागरी पोलीस ठाणे पदी कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके यांची नियुक्ती सफाळे पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या जागी करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळ यांच्या मान्यतेने प्रशासकीय निकडीनुसार पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया क्रीशन गोस्वामी यांची नियुक्ती केळवा सागरी पोलीस ठाणे पदी शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 पासून करण्यात आली असून त्यांनी शनिवारी केळवा सागरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.याआधी त्यां मुंबई आणि डहाणू पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या.
.



