जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (प्रतिनिधी) – अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती , भिमाई बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान , व मा. सभापती महिला व बालकल्याण समिती करमाळा नगरपरिषद सौ . सविता जयकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे यामध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन एच. व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय दिगंबररावजी बागल हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून करमाळा एसटी आगाराची आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये आबास शेख प्रतिष्ठित व्यापारी करमाळा हे राहणार आहेत 1

तसेच मौलाली नगर येथे दत्तक घेतलेले 28 मुलांना दुपारी एक ते दोन या वेळेमध्ये शालेय साहित्याची वाटप करण्यात येणार आहे असे भिमाई बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळी फिरोज शेख सनी कांबळे मंगेश ओहोळ समीर शेख गणेश झाकणे सुभाष गोसावी साहिल दारुवाले आकाश धनवे शंभू ताहेर शेख सागर पवार गणेश टकले शैलेश कांबळे राजू पवार आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते.



