निधन वार्ता

पालघर जिल्ह्यातील पास्थळ येथील मनोहर परशुराम राऊत यांचे दुःखद निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील पास्थळ येथील मनोहर परशुराम राऊत यांचे वयाच्या 91 वर्षी दि. 29 ऑक्टोबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील वर्णाकुलम फायनल शिक्षण पूर्ण केल्यानंतर ; कोसबाड हिल येथे शेती विषयक अभ्यासक्रम पूर्ण करून नाशिक, मुरबाड, वसई, अंधेरी, सावंतवाडी, अलिबाग, उमरोळी, पंचाळी, डहाणू येथे ग्रामसेवक ते कृषी विस्तार अधिकारी या पदावर काम करून 1992 साली ते सेवानिवृत्त झाले होते.

सेवानिवृत्ती नंतर कुणबी समाजोन्नती संघ पालघरचे अध्यक्ष होते. यात समाजाची संघटनात्मक बांधणी करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. पास्थळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे देखील ते चेअरमन होते. परनाळी गिरिजा शंकर मंदिर ट्रस्ट येथे ट्रस्टी म्हणून काम पाहिले आहे. शिक्षक- पालक संघाचे अध्यक्ष व गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय योगदान राहिले आहे. राऊत परिवारातील संमेलन, बालमेळावा, व्याख्यानमाला, मेळावा अशा अनेक उपक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त व प्रेरक सहभाग असे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button