महाराष्ट्र

मॅड फॉउंडेशन विक्रमगड येथे जैन डॉक्टरस फेडरेशन तर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन

(ठाणे जिल्हा प्रतिनिधी):- राजेंद्र भगवान भोईर टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क (मो.९०२८३०५३१९)

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये कार्यरत असणारी मॅड फॉउंडेशन संस्था येथे जैन डॉक्टरस फेडेरेशन, मुंबई यांच्या सहयोगाने विक्रमगड मधील महिलांसाठी व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला व बालक यांच्या आरोग्याचे अनेक समस्या निर्माण होत असतात.

या आरोग्याच्या समस्या दूर करता याव्या हा उद्धेश ठेऊन या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक सहभागी झाले होते, यात स्त्री रोग तज्ञ, बाळ रोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ व जनरल तज्ञ डॉक्टर सहभागी होते. डॉ. वैशाली बोरीचा, डॉ. दिव्याल गाला, डॉ. चित्रलेखा मेहता, डॉ. श्रुनाल कामदार, डॉ. श्रेणिता चौहान, डॉ.प्रमोद जैन, डॉ. अशोक जैन, डॉ. कपिल सिसोडिया, डॉ. देवेंद्र जैन, डॉ. संजय बोरा या डॉक्टरचे पथक सहभाग होते.

या शिबिरासाठी मॅड फॉउंडेशन चे संयोजक श्री. रमेश भोईर , ट्रस्टी श्री.पराग मेहता, श्री. राहुल बम, श्री. दकशेश शहा , विक्रमगड विधानसभेचे निवडणूक प्रमुख तसेच भाजपा चे सरचिटणीस डॉ. हेंमत विष्णू सवरा व मॕड चे सहकारी कु. तन्वी भोईर , सौ. दिपाली कुवरा व विद्यार्थी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button