शहर

“रुग्णसेवक” बाबा मिस्त्री यांनी काँग्रेस कडे केली दक्षिण सोलापूर च्या उमेदवारीची मागणी…

नई जिंदगी परिसराचे अनेक वर्षे नगरसेवक असलेले बाबा मिस्त्री काँगेस चे कट्टर समर्थक….

सुशीलकुमार शिंदे आणि नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू म्हणून जिल्ह्यात ओळख…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूर च्या नई जिंदगी परिसराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा “रुग्णसेवक” बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे.शनिवारी काँग्रेस भवनात वीस हजार रुपये भरून त्यांनी दक्षिण सोलापूर च्या काँग्रेस उमेदवारीची मागणी केली

कांग्रेस पक्षाचा रितसर अर्ज घेऊन तो शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे त्यांनी सुपूर्त केला.2019 च्या विधानसभा निवडणूक वेळी बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूर मधून निवडणुक लढवली होती,त्यांना ग्रामीण आणि शहरी भागात देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता,त्या वेळी बाबा मिस्त्री यांना तब्बल 58000 मते मिळाली होती…

या वेळी बोलताना बाबा मिस्त्री म्हणाले की,2019 मध्ये मी नवखा उमेदवार असतानाही निवडणूक लढवली,मला दक्षिण सोलापूर येथील जनतेने प्रचंड प्रेम दिले,आजही दक्षिण सोलापूर तालुक्यात जमिनीवरचा आणि साधी राहणीमान असलेला कार्यकर्ता म्हणून माझ्या नावाला पसंती दिली जाते,मी त्या वेळी जरी निवडणुक हरलो असलो तरी अजुन म्हणावा तसा विकास दक्षिण सोलापूर चा झालेला नाहीय आणि तो मी करण्यास कटिबद्ध आहे असे हि ते शेवटी म्हणाले…

मला मागच्या निवडणुकीचा चांगला अनुभव असून यंदा काँग्रेसला चांगले वातावरण आहे मला पक्षाने तिकीट दिले आणि मी निवडून आलो तर रुग्णांसाठी मोठे कार्य करणार असल्याचे हि ते म्हणाले…

यावेळी अँड अब्दुल पठाण,बुरहान मुल्ला,अझर शेख,किसन मेकाले,तिरुपती परकीपंडला,भीमाशंकर टेकाळे,NK क्षीरसागर,विजय शाबादी,शिरीष जाधव,सलीम मणूरे,राजू गडदे,मोहसीन फुलारी,महादेव येरनाळ,यतिश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button