महाराष्ट्र

बुरुड समाज मोफत सामुदायिक विवाह सोहळा, मोहोळ – 2025

श्री विठ्ठल (भाऊ) खंडू सुपेकर
यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चाने करण्याचे योजले आहे

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

३० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्या.६ वा २१ मि.श्रीराम मंगल कार्यालय व लॉन्स मोहोळ येथे होणाऱ्या बुरुड समाज मोफत सामुदायक विवाह सोहळा या विवाह सोहळ्याचे नियोजन चर्चा करण्याकरिता व विवाह सोहळ्याचे नूतन समिती जाहीर करण्याकरता
रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी मोहोळ येथे श्री महालक्ष्मी स्टोन अँड बांबू डेपो श्री ज्ञानदेव सुपेकर यांच्या दुकानांमध्ये मिटींगचे आयोजन करण्यात आले होते

या मीटिंगमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं श्री संदीप शेंद्रे यांनी स्वागत केलं व मान्यवरांच्या हस्ते मोहोळ गावचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज व बुरुड समाजाचे धर्मगुरू श्री केतय्या स्वामी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रथम चंद्रमोळी गणेश मंदिर स्वयंभू गणपती व श्री नागनाथ महाराज यांच्या मंदिरात जाऊन पोम्प्लेट पूजन करून देवा समोर ठेवण्यात आले
महेश सूर्यवंशी यांनी प्रस्ताविका मध्ये ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याची भाऊंनी संकल्पना कशा पद्धतीने मांडली ते सांगण्यात आलं

तसेच आजपर्यंत झालेल्या तीन-चार मिटींगचा आडवां सर्वांसमोर मांडला ज्या समाज बांधवांना या विवाह सोहळ्याच्या वेगवेगळे समिती वरती घेण्यात आलेल्या आहे सर्वांसमोर नावे वाचून दाखवण्यात आले.श्री सूर्यकांत शेंद्रे सर, श्री दशरथ वडतिले, श्री महालिंग सावंत, सर्व शेवटी श्री राजेंद्र सूर्यवंशी सर व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले

जिल्ह्यातून जास्तीत जास्त जुळलेले लग्न विवाह सोहळ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार व विवाह सोहळ्याची कोणतीही जबाबदारी द्या ते आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू असे तालुका अध्यक्ष आश्वासन दिले
या मीटिंगसाठी सोलापूर जिल्ह्यातून या विवाह सोहळ्याचे दानशूर व्यक्तिमत्व श्री विठ्ठल भाऊ सुपेकर,श्री राजेंद्र सूर्यवंशी सर, श्री सूर्यकांत शेंद्रे सर, श्री दीपक सूर्यवंशी, श्री महालिंग सावंत,श्री दशरथ वडतिले,श्री हनुमंत पवार, श्री राजू वडतिले, श्री अमोल जगताप, श्री संतोष मोरे, श्री विनोद वडतिले,श्री चेतन सुरवसे, श्री ओंकार बुरुड, श्री संतोष पवार, श्री विठ्ठल साळुंखे,श्री प्रल्हाद साळुंखे, श्री शिवाजी रोहिटे, भारत वडतिले, श्री प्रकाश रोहिटे, श्री मल्लिकार्जुन वडतिले, श्री विजय ता, सूर्यवंशी,श्री सचिन वडतिले, श्री युवराज सुरवसे, श्री नितीन वडतिले, श्री किरण सुरवसे या विवाह सोहळ्याचे मुख्य समिती श्री महेश सूर्यवंशी, श्री देविदास वडतिले, श्री संदीप वडतिले, श्री माणिक रोहिटे, श्री ज्ञानदेव सुपेकर तसेच मोहोळ शहर बुरुड समाज व युवक हे सर्वजण उपस्थित होते
आजच्या मिटींगचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल साळुंखे यांनी खूप छान केले व शेवटचे गोड आभार भाऊंचे नातू चि. सिद्धार्थ सुपेकर यांनी मांणले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button