मॅड फॉउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी तुळशी रोप देऊन केली… आषाढी एकादशी साजरी

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मॅड फॉउंडेशन येथील विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही एक झाड आपल्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलेले आहे. त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवाडीस प्राधान्य द्यावे.

तसेच राज्यातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार असून या माध्यमातून अर्बन फ़ॉरेस्ट ही संकल्पना राज्यभरात राबवली जाणार आहे, या पाश्वभूमीवर मॅड फॉउंडेशन च्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून डोक्यावर तुळस आणि हातात टाळ, विना घेऊन विठू नामाचा जयघोषा बरोबर पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड चे महत्त्व सांगत दिंडी काढली. दिंडीची सांगता विक्रमगड मधील विठ्ठल-रुख्मिणी च्या मंदिरात करण्यात आली.

मंदिरात वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना तुळशीच्या रोपाचे वाटप केले. यावेळी विक्रमगड तालुक्याच्या तहसीलदार मा.चारुशीला पवार मॅडम यांना देखील वारकरी विद्यार्थीनी तुळशीचे रोप दिले. या दिंडीचे आयोजन मॅड फॉउंडेशन चे सदस्य श्री. रमेश भोईर, तन्वी भोईर, दीपाली भडांगे, एकनाथ राऊत, नवनाथ थोटगे व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले.




