शहर

मनसे पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमुळे सफाळे एडवण येथील सराफाने लंपास केलेले सोने गावकऱ्यांना मिळाले परत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

सफाळे एडवण गावातील महिला व नागरिकांची गेल्या 3 वर्षापासून फसवणूक करणाऱ्या सराफाला सफाळे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलचा दणका दाखवून या गावातील अनेक महिला पुरुषांचे गेल्या तीन वर्षापासून नवीन सोने बनवण्यासाठी दिलेले पैसे व नवे-जुने सोने परत मिळवून दिले आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे एडवण येथे हरीश सोनी या मालकाचे ओम साई ज्वेलर्स हे सोन्या- चांदीचे दुकान आहे. या दुकानाच्या मालकाकडे एडवण गावातील महिला व पुरुषांनी गेल्या तीन वर्षा आधी नवीन सोने बनवण्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट व जुने सोने दिले होते.
परंतु हा सोनार गेल्या तीन वर्षापासून या सर्व ग्राहकांची फसवणूक करूत होता.


हे ग्राहक आपले बनवण्यासाठी दिलेल्या नवीन सोने मागण्यासाठी गेल्यावर हा सराफ या सर्व ग्राहकांची तीन वर्षापासून फसवणूक करत होता.
या सराफाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर उप तालुका अध्यक्ष चेतन पाटील, पालघर तालुका अध्यक्ष संदीप किनी, दिनेश गवई पालघर जिल्हा सचिव, पालघर उपतालुका अध्यक्ष रोहिदास भगत, सुनील पाटील माथाडी राज्य उपाध्यक्ष, व मितेश तरे एडवण विभाग अध्यक्ष मनसे या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी मनसे स्टाईलने दणका दाखवून एडवण गावातील पंधरा महिला पुरुषांचे सोने परत मिळवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button