महाराष्ट्र
आरक्षणावरील सुनावणी तहकूब; आयोगाला 3 आठवड्यांची मुदतवाढ
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे आणि 13 जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर आता पुढचा मोर्चा थेट मुंबईत, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाची भेट घेत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणासंदर्भात बुधवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने राज्य मागास आयोगाला तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार आहे.