शहर

जव्हार तालुक्यातील दाभोसा, हिरडपाडा, काळमांडावी या धबधबाच्या ठिकाणी मनाई आदेश लागू

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यात मान्सून कालावधीत मोठ्याप्रमाणात पर्यटक धबधबे, तलाव, धरणे पाहण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यातील “दाभोसा धबधबा, हिरडपाडा धबधबा तसेच काळमांडावी धबधबा” पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, वसई- विरार, नाशिक तसेच जव्हार तालुक्याला लागून असलेले गुजरात राज्यातील पर्यटक येत असतात.

सदर धबधबे हे प्राचीन काळातील, खोलीचे व कडाकपारीचे असून त्या ठिकाणी उत्साही पर्यटक पाण्याचा आनंद घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरतात, परंतु सदर ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून तेथे कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध नसल्याने धबधब्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याने सदर ठिकाणी पुन्हा जीवितहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांची सुरक्षितता अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे गरजेचे आहे.


याअर्थी जव्हार उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी मा. करिश्मा नायर, यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जव्हार व मोखाडा तालुक्यातील धबधबे, तलाव, धरणे इत्यादी पर्यटन स्थळच्या ५०० मीटर परिसरात ०४/०७/२०२४ रोजी ००. ०१ वाजेपासून ते दि. ३०/०९/२०२४ रोजी २४. ०० वाजेपर्यंत या कालावधीमध्ये पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे इ. बाबींकरिता मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

सदरच्या मनाई आदेशाचे भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४(c) व ५१(b ) नुसार कारवाई करण्याचे आदेश मा. करिश्मा नायर मॅडम, उपविभागीय दंडाधिकारी जव्हार विभाग, जव्हार यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button