महाराष्ट्र

नेहमीच तापलेले राजकारण असलेल्या माळशिरस तालुक्यात “ते तीन नेते” एकाच व्यासपीठावर…

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार उत्तमराव जानकर आणि माजी आमदार राम सातपुते यांची होलार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते,मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टिका केल्याची पाहायला मिळालेले असताना आज माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,तसेच माजी आमदार राम सातपुते हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं…

सदरचा मेळावा हा होलार समाजाने आयोजित केला असल्याची माहिती होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी दिली,या कार्यक्रमात वरील नेते मंडळी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं,या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट सुद्धा आवर्जून उपस्थित होते हे विशेष…

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक भाष्य करुन राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,महानगरपालिका या निवडणुका होत आहेत…

येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता या निवडणुका पार पाडण्याचे आदेश सर्व आमदार,खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांना दिले असल्याचे टाइम्स 9 च्या सुत्रांनी सांगितले…

त्यामुळेच या ठिकाणी कार्यक्रमाला हे तिन्ही मातब्बर मंडळी एकत्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे,माजी आमदार राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर अनेक आरोप प्रत्यारोपा सह जहरी टीका केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी वरील नेते मंडळी एका स्टेजवर एकत्र पहायला मिळाली हे विशेष…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button