महाराष्ट्र

एमआयडीसी बारामती येथे अकलूजचे व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज येथील लेखक आणि सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच अकलूज आघात वाहक म्हणून कार्यरत असलेले चंद्रशेखर गायकवाड यांचे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीसी आगारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न झाले या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेबांच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला आणि उपस्थितांनी प्रतिसाद देत व्याख्यान शांतचित्ताने ऐकले

व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांचे आजचे व्याख्यान
“आधुनिक भारताच्या जडण घडणीत डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ” या विषया वर संपन्न झाले व्याख्यान सकाळी 11 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला तसेच याप्रसंगी एमआयडीसी बारामती आगारव्यवस्थापक तांबेमँडम या उपस्थित होत्या .

तसेच या व्याख्यान चे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती एम आय डी सी बारामती आगारातील कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button