महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार उद्धवजी ठाकरे

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर उभारणीच्या अनुषंगाने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी जनसुनावणीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती व सोबतच्या मच्छिमार आदिवासी संघटनची मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली.

जनसुनावणीत वाढवण बंदर विरोधात शिवसेना (उ.बा.ठा) मोठ्या ताकतीने लोकांसोबत आहे असे समितीला सांगितले. तसेच वाढवण बंदर विरोधा बाबत मुळ शिवसेना कायम स्थानिक भुमिपुत्रांच्या पाठीशी उभी होती व आहे अस सागून लवरच पालघरला येऊन वाढवण बंदर विरोधी ग्रामस्थांच्या भेटीला येण्याचे आश्वासन उद्धवजी ठाकरे यांनी वाढवण येथील ग्रामस्थांना दिले आहे.

सदर बैठकीत आमदार विनोद निकोले, जिल्हाप्रमुख विकास मोरे, जि.प सदस्य व‌गटनेते तथा शिवसेना (उ.बा.ठा) पालघर विधानसभा संघटक जयेंद्रजी दुबळा, मिलिंद राऊत, रामकृष्ण तांडेल,अनिकेत पाटील, देवेंद्र तांडेल, स्वप्निल तरे, दिपक भंडारी, भुपेंद्र राऊत, दिपेश बीज, रमेश गवळी, कुणाल राऊत, मिलिंद अक्रे, निशिकांत शनवार, किरण दळवी, तुषार राऊत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button