महाराष्ट्र

“वृक्ष माझ्या कुटुंबातील सदस्य” या संकल्पनेतून धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थाचे वृक्ष रोपन

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संगमनगर येथे “वृक्ष माझ्या कुटूंबातील सदस्य” या संकल्पनेतून धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था संगमनगर, विक्रमगड व वनवासी कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यातील सारसी तांबडमाळ येथे गावातील ५५ कुटुंबांना प्रत्येकी दोन झाडे (आंबा,जांभूळ) देऊन त्यांचे पूजन करून आपआपल्या घरासमोर, वाडीत त्याची लागवड करून, वृक्ष माझ्या कुटुंबातील सदस्य ही संकल्पना राबवण्यात आली,

या कार्यक्रमाप्रसंगी गावचे प्रमुख श्री. दिलीप दुमाडा, श्री. संतु खरपडे , वनवासी कल्याण आश्रमचे कार्यकर्ते मुंबईकर श्री. श्रीधर कोचरेकर काका , श्री. प्रबोध जी, धरतरीचे कार्यकर्ते श्री. मधुकर मालकरी,श्री. संजय पारधी, श्री. दुर्वास पवार, श्री. विजय मेघवाली, अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button