शहर

डहाणू महावितरण विभाग कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील डहाणू आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड यांना एका वीस ग्राहकाकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पालघर पोलीस उपाधीक्षक हर्षल चव्हाण यांनी गुरुवारी रंगेहात अटक करून त्यांच्या विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वीज चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी व वीजजोडणी पुनर स्थापित ठेवण्यासाठी डहाणू महावितरण विभाग कनिष्ठ अभियंता वर्ग 3 अतुल आव्हाड ( वय वर्ष 42 )यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

डहाणू येथील एका म्हशीच्या तबेल्यामध्ये आकडा हुक टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता कारवाई पासून मुक्त करण्यासाठी व वीज पुरवठा कायम ठेवण्यासाठी कनिष्ठ अभियंता डहाणू वर्ग (3) अतुल आव्हाड यांनी या तबेला मालकाकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत (40 वर्षीय) तबेला मालकाने या अभियंत्याची लिखित तक्रार पालघर अँटीकरप्शन विभागात केली होती.

याबाब पालघर अँटीकरप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी पडताळणी करून पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ), अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ),अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सापळा रचून कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड यांना तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्या विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही यशस्वी कारवाई पालघर अँटी करप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये,दीपक सुमडा आकाश लोहरे, जितेंद्र गवळी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button