शहर

पालघर जिल्ह्यातील पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी अभिजीत धाराशिवकर यांची नियुक्ती

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजीत तानाजी धाराशिवकर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र शासन अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
या आधी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून श्रीमती नीता अशोक पाडवी यांच्याकडे हा पदभार होता.
त्यांची बदली आता मुंबई शहर येथे
करण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील एकूण 78 पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या जुलै 2024 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 76 सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सोमवार दिनांक 8 जुलै 2024 पासून पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजीत तानाजी धाराशिवकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
याआधी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजीत तानाजी धाराशिवकर यांनी नांदेड शहर, बार्शी आणि बीड जिल्हा या तीन ठिकाणी उपविभागी पोलीस अधिकारी म्हणून पदभार भूषविलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button