युवा महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कारवाई मुळे वाळू आणि मुरुम माफियांचे धाबे दणाणले…

🎯 सदरची घटना माढा लोकसभा मतदार संघात घडल्याने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय वन विभागाचे सचिव तन्मयकुमार यांची घेतली भेट…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुर्डुवाडी येथून हाकेच्या अंतरावर असणारे कुर्डू या गावा मध्ये मुरूम माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे,या सर्व घटनांना धीरोदात्त पणे सामोरी जाणारी डॅशिंग IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या बाबतीतला हा शब्द प्रपंच…
IPS अंजना कृष्णा या युवा महिलेने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले या महिलेची कथा,जिने संकल्प,मेहनत आणि धैर्याच्या जोरावर देशसेवेचं स्वप्न वास्तवात उतरवलं…

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या आई ह्या न्यायालयात टायपिस्ट चे काम करतात तर वडील हे एक छोटे दुकानदार असून सामान्य घरातील ह्या मुलीने मात्र अपार चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या जोरावर मोठी स्वप्नं साकार करू शकली…
लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासू असलेल्या अंजनाने B.Sc (Maths) पूर्ण केले असून या मुलीने तिच्या प्रबळ इच्छा शक्ती द्वारे “देशाची सेवा” हा एकमेव ध्यास हाती घेत कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत…
याच उद्दिष्टाने तिने UPSC Civil Services परीक्षेची वाट धरली.अथक परिश्रमांमुळे 2022 मध्ये All India Rank 355 मिळवत भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश मिळवला…
आज अंजना कृष्णा ह्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे Sub-Divisional Police Officer (SDPO) म्हणून कार्यरत आहेत.इथे त्यांनी थेट बेकायदेशीर वाळू आणि मुरुम उत्खननाविरोधात (Sand Mafia) लढा दिला.एका धोकादायक ऑपरेशनमध्ये त्यांनी कोणत्याही दबावाला झुकवून न घेता कायद्याचं पालन घडवलं.
धैर्य,प्रामाणिकपणा आणि निश्चयी वृत्तीमुळे अंजना कृष्णा आज सर्वत्र चर्चेत हि आहेत आणि त्या सर्वांना प्रेरणादायी हि ठरत आहेत…
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असलेल्या वाळू आणि मुरुम माफियांच्या कारवाई मध्ये महाराष्ट्राच्या एका जबाबदार नेत्याने वक्तव्य केलेले आपल्याला पहायला मिळाले…

या सर्व घटनांवर मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना “अभय” दिले असून हि घटना माढा लोकसभा मतदार संघात घडली असल्याने येथील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वन विभागाच्या सचिवांची भेट घेत संबंधित सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली असल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…



