महाराष्ट्र

बकरी ईद ची नमाज सोमवारी ईदगाह मैदानावर सव्वा आठ वाजता होणार,हाजी कलीम काझी यांची माहिती

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

दिनांक 17/06/2024 रोजी बकरीद ईद ( ईद उल अजहा ) ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08/15 वाजता होईल अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले असुन शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे

तसेच समाज बांधवांनी ईद ची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात कुर्बानी करावी व कुर्बानी केल्यानंतर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडिया वर प्रसारित करु नये. तसेच कुर्बानी केल्यानंतर परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा व शासनाने दिलेल्या अटी व शर्ती चे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईद चा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले आहे

यावेळी समीर भाई शेख, आझाद भाई शेख, जमीर भाई सय्यद , रमजान भाई बेग, सुरज भाई शेख, जहांगीर भाई बेग, दिशान भाई कबीर, मुसतकीम भाई पठाण , इकबाल भाई शेख, इमित्याज भाई पठाण, आलिम भाई खान, अरबाज भाई बेग, शाहीद भाई बेग कलीम भाई शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button