करकंब चे “साथी” समीर बागवान यांचे आकस्मिक निधन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
करकंब येथील प्रगतशील बागायतदार आणि बागवान समाजातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेल्या समीर बागवान यांचे 18/06/”24 रोजी रात्री इशा ची नमाज पठण करत असतानाच ऋदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले…
मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्षाचे होते,त्यांच्या मागे पत्नी चार मुली एक मुलगा आणि सातारा येथील जावई असा मोठा परिवार असुन करकंब च्या बागवान जमातीचे जिम्मेदार हाजी हारूनभाई बागवान यांचे समीर हे पुतणे आणि सोलापूर येथील राजूभाई कल्याणी यांचे ते भाच्चे होते…
मयत समीर हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते,ते जमातीचे करकंब सेंटर चे जिम्मेदार म्हणुन हि प्रसिद्ध होते,त्यांच्या जाण्याने करकंब सह सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला,कुर्डूवाडी,अकलूज,माढा,मोहोळ येथील जमातीच्या सर्व “साथी” दारांनी शोक व्यक्त केला…
“साथी” समीर बागवान यांच्या अंत्य यात्रेत समाज घटकातील सर्व नागरिक हजर होते,या वेळी करकंब येथील नागरिकांनी हि शोक व्यक्त केला…



