शहर

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

महागाव येथील एल.के. कॉन्व्हेंट शाळेच्या हॉलमध्ये महागाव तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी मधील धनगर समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा, कर्मचाऱ्यांचा व समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा धनगर अधिकारी कर्मचारी संघटना शाखा महागावच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय श्री पवनजी थोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे जेष्ठ नेते कॉंग्रेसचे अँड.सचिनजी नाईक,सेवानिवृत्त आर.टी.ओ गोविंदरावजी तास्के, सेवानिवृत्त लेखा अधिकारी सुभाषजी बोडखे,नारायणराव पाटील,महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोलजी चिकने,बबनरावजी कोरके सर,संजय पाटे,बा.ना.सु.संचालक श्री.स्वप्निल नाईक हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी,बारावी,सीईटी,नीटपरिक्षेत महागाव तालुक्यातील साठ विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला

यावेळी भारतीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सचिनची नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये परीक्षेत कमी मार्क पडले तरी हार मानू नये प्रयत्न केल्यानंतर नक्कीच यश मिळेल.बारावीनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ज्या क्षेत्राकडे जायचे आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे.कारण अनेक विद्यार्थी आज सुशिक्षित बेरोजगार आहेत.सरकारने नोकऱ्या देणे बंद केले.आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नौकरी दिल्या जात आहे.त्यामुळे भविष्य घडवताना स्वतंत्र व्यवसायाचे शिक्षण घेतलेले बरे राहील असे यावेळी सांगण्यात आले.

पुढील सत्रात दहावी,बारावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले बक्षीस मनोज अनुसे यांनी ५००० पाच हजार रुपये दुसरे बक्षीस सदानंद लाहेवार यांनी ३०००रु. तीन हजार रुपये व तिसरे बक्षीस शिवाजी टेकाळे सर यांनी २००० रू दोन हजार रुपये देण्याचे या ठिकाणी जाहीर केले

या कार्यक्रमाला महागाव तालुक्यातील धनगर समाजातील मंडळी,पाटील सर सदानंद लाहेवार,मंचकराव गोरे,शरद काकडे,राजेश हिंगाडे,संतोष कोरके,मनोज फटीग,मस्के साहेब,नंदकिशोर पानोडे,बबनजी मोहटे,मनोज अनुसे हे होते.

या कार्यक्रमाचे आयोजन महागाव तालुका धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेने केले होते तर सूत्रसंचलन गजानन काळसरे यांनी केले तर आभार सचिन खटके यांनी मानले यावेळी असंख्य धनगर समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button