संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान संस्थेचे नवर्निवाचित अध्यक्ष श्री. मिलिंद वसंत पाटील उर्फ ‘बंटी’ यांना सोसायटी च्या ९५ लाखाचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाणे प्रतिनिधी (राजेंद्र भोईर )
विक्रमगड तालुक्यातील संजीवन ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहाय्यता प्रतिष्ठान ओंदे , ता.विक्रमगड चे नवर्निवाचित अध्यक्ष व चेतना गार्डन चे मालक श्री . मिलिंद वसंत पाटील उर्फ बंटी यांनी ते राहत असलेल्या जकरंद को आॕप.हाॕसिंग सोसायटी लि.आंनदनगर व्हिलेज, कावेसर घोडबंदर रोड ठाणे. या सोसायटीचे अध्यक्ष श्री.अमित शर्मा व सचिव श्री.मिलिंद पाटील असताना सन २०१९ ते २०२२ या कालावधी रु. ९५,६६,३५५/- इतकी रक्कम संस्था सभासदांचा विश्वासघात करुन

नियमबाह्यपणे ओम साई एंटरप्रायझेस व सिद्धी एंटरप्रायझेस यांचे व अन्य खात्यावर वर्ग करून रु. ९५,६६,३५५/- रक्कमेचा अपहार करून संस्थेस आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरुन श्री . मिलिंद वसंत पाटील उर्फ बंटी यांना कासारवडवली पोलिस ठाण्याचे क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आव्हाड साहेब व त्याच्या टिमने पुढील सखोल तपासा साठी ताब्यात घेतले आहे.



