माढा लोकसभेतील भाजपा कुठे काय करत आहे…? राजकीय जाणकारांचे मत
आमीर मोहोळकर
अकलूज शहर प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाइल नंबर 9890299499
माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या मोहिते पाटील गटाला डावलून फलटण येथील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्या पासून माढा लोकसभा मतदार संघातील भाजपा कुठे आहे…? ती हरवली तर नाही ना…? असे म्हणण्याची वेळ आज भाजपा वर आली आहे असे परखड मत राजकीय जाणकार बोलाय लागलेत…
तसे पहायला गेल्यास भाजपाच्या महाराष्ट्रातील अधोगतीला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचे सुध्दा कुजबुजले जाऊ लागले आहे…
ज्या दिवसापासून अकलूज च्या “शिवरत्न” वर संकट मोचक येऊन गेले त्या दिवसापासून भाजपा ला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे लक्ष “तुतारी” ने वेधुन घेतले आहे हे मात्र तितकेच खरे…
भाजपा हा लोकसभे साठी कुणा बरोबर हि “तह” करू शकतो पण भविष्य काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचेच 105 आमदारांना कसे हॅण्डल करायचे…? हा यक्ष प्रश्न त्यांचे समोर असेल…
आता राहिली गोष्ट माढा लोकसभा मतदार संघाची तर येथे भाजपा चा उमेदवार च परावलंबी भूमिकेत असुन ते पाच आमदार पर्मनंट असल्या सारखे त्यांच्या जिवावर ते एवढी मोठी लोकसभा लढण्याची “रिस्क” घेत आहेत आणि याच कारणामुळे जनता त्यांच्यावर नाराज असुन मोहिते पाटील हा गट जनतेची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी झाल्याने नव्या आणि जुन्या भाजपा च्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असुन ते हि आता सैरभैर अवस्थेत असल्याचे दिसत आहे…
अशी परिस्थिती एकट्या माढा लोकसभे ची नसुन जवळच्या सातारा,बारामती,सोलापूर येथे हि भाजपा चे काही दिवे लागतील असे तर सध्या वाटत नसुन याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत…
भाजपा ला निवडणूकी आधीच चिंतन करणे जरुरीचे आहे नाही तर नेते महायुती कडे आणि जनता “तुतारी” कडे असे एकंदरीत चित्र माढा लोकसभे सह सगळीकडे पहायला मिळेल एवढे मात्र निश्चित च खरे आहे…
या मागील सर्व गोष्टींचा विचार केल्यास या निवडणुकीत मुळ भाजपा हा पक्षच कुठे दिसत नसुन गेल्या पाच वर्षा पुर्वी केलेली मोक्कार भरती वर च ह्यांचे भवितव्य अवलंबून आहे असे सध्या तरी दिसत आहे…बाकी आपली मर्जी…