शैक्षणिक

अकलूज येथील भक्ती टायपिंग इन्स्टिट्यूटने परंपरा कायम राखत जीसीसी-टीबीसी परीक्षेत हर्ष जयंत ढवळे 97% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम तर द्वितीय कु.बोरकर सुप्रिया महादेव 96 % गुण मिळवून उज्वल यश प्राप्त केले

उपसंपादक हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

या परीक्षेमध्ये संस्थेतील हर्ष जयंत ढवळे याने मराठी 30 श.प्र.मि. या विषयात 97% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.तर कु.बोरकर सुप्रिया महादेव हिने 96% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळविला.कु.शिंदे प्रियंका शंकर हिने मराठी 30 या विषयात तर कु.लोंढे तृप्ती चांगदेव हिने इंग्रजी 30 या विषयात 94.50% गुण प्राप्त करत संस्थेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.

ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये देखील भक्ती कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूजच्याच कु.शेख आयेशा सलामत हिने इंग्रजी 30 श.प्र.मि या विषयात 96%, बालगुडे प्रीतम भाऊसाहेब याने इंग्रजी 30 या विषयात 95%, तर कु.आसबे सोनाली वासुदेव हिने इंग्रजी 30 तसेच वाडकर गणेश संदीप याने इंग्रजी 30 श.प्र.मि.या विषयात 94% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळविला होता.तीच परंपरा यावेळेस देखील संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले

विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
जीसीसी-टीबीसी मराठी 30 श.प्र.मि. या विषयात:- ढवळे हर्ष जयंत 97% प्रथम, कु.बोरकर सुप्रिया महादेव 96% द्वितीय, कु.शिंदे प्रियांका शंकर 94.50% तृतीय.जीसीसी-टीबीसी इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात :- कु.लोंढे तृप्ती चांगदेव 94.50% प्रथम, शेख फैय्याज हुसेन 91.50% द्वितीय, कु.लोंढे उमा हरिदास 91% तृतीय.

जीसीसी-टीबीसी इंग्रजी 40 श.प्र.मि. या विषयात :- कु.चव्हाण प्रियंका दादासो 87% प्रथम, ढवळे हर्ष जयंत 86% द्वितीय, कु.सपताळे कोमल कांतीलाल 83% तृतीय.तर कु.माने-देशमुख भावना शहाजीराव हिने मराठी 40 या विषयात 79.50% गुण प्राप्त करत विशेष उल्लेखनीय यश मिळवले.

तर या परीक्षेतील प्रश्न विभाग एक मध्ये कु.शिंदे सारिका बापू हिने 50 पैकी 50 गुण प्राप्त केले, विभाग दोन मध्ये कु.कोडग प्रियांका सुरेश, लिगडे आदेश साहेबराव, कु.लोंढे तृप्ती चांगदेव, सपताळे मनोज रामचंद्र, चौगुले विक्रम विश्वास, ढवळे हर्ष जयंत, कु.माने देशमुख भावना शहाजीराव, पाटील शरद बाबासाहेब यांनी 30 पैकी 30 गुण प्राप्त केले तर विभाग तीन मध्ये शेख फैयाज हुसेन यांनी 20 पैकी 20 गुण मिळवत या सर्वांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ सर, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, संचिता नेटके मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त केलेल्या तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button