माढ्यात कमळाचं वातावरण “तुतारी” त का बदलले …
विषेश प्रतिनिधी.अकलूज
मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर कृष्णा-भिमा स्थिरीकरणाशिवाय काहीच मागितले नव्हते.२०१९ ला दिलेला उमेदवार केवळ माळशिरस तालुक्याच्या जोरावर निवडुन आणला.मोहिते पाटलांसारखी निस्वार्थी माणसं मी पाहिलीच नाहीत हे दुस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी टीव्हीवरील मुलाखतीत सांगितले.पण कृष्णा-भिमा स्थिरीकरणा विषयी मंत्रालयात मिटींग होत असताना मोहिते पाटील यांना जाणिवपुर्वक लांब ठेवण्यात आले.
विद्यमान खासदारांनी सातारा जिल्ह्यातुन सोलापुर जिल्ह्याच्या पक्षसंघटनेत लक्ष घालत संघटनात्मक निवडी करत असताना मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर जाणुन बुजुन अन्याय करण्याची भुमिका घेतली.ज्यांच्या जीवावर खासदार,आमदार निवडुन आले त्यांनाच आव्हान देण्याची भाषा बोलु लागले,गेल्या ७० वर्षां पासून हाताच्या फोडाप्रमाणे जपत बांधणी केलेल्या मतदारसंघात हस्तक्षेप करत घाण करून लागले.अधिकार्यांना विधान भवनात प्रश्न उपस्थित करण्याच्या धमक्या देत दबावाखाली ठेवले जावु लागले,टक्केवारीची हद्द झाली.
अगोदर माळशिरस तालुक्यात सेवेसाठी येण्यास अधिकार्यांची स्पर्धा असायची आता कोणत्याही विभागाचे अधिकार्री माळशिरसला येण्यास घाबरायला लागले.कामांच्या बाबतीत अडवणूक सुरू झाली,निधी वाटताना मोहिते विरोधकांना बळ दिले गेले.ज्यांनी निवडून आणलं त्याच्या बंगल्याची पायरी न चढण्याच्या घोषणा झाल्या,एवढं होऊनही पक्षनेते किंवा वरिष्ठांनी कधीही यात लक्ष घातले नाही अथवा मुद्दाम दुर्लक्ष केले गेले,पुन्हा निंबाळकरांची उमेदवारी लादली गेली.या सर्व प्रकाराला जनता वैतागली.
बाहेरुन लादलेले इथे येउन इथल्या नेतृत्वाला आव्हान देवु लागले पक्ष नेतृत्वाला उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही व्यक्तिप्रेमात आंधळे झालेल्या काही भाजप नेत्याना हे वास्तव दिसून आले नाही.एवढे सर्व होऊनही मोहिते परिवार शांत होता परंतु परवा झालेल्या कृतघ्नता मेळाव्याच्या भाषणात मी पणाचा माज होता.निवडुन देणार्याप्रति कृतज्ञता व्यक्त न करता कृतघ्नता होती.सगळ सगळ डोक्यावरुन जात होते.
याच सगळ्या गोष्टींचा उद्रेक म्हणजेच….
तुतारी