शहर

माळशिरस तालुक्यात अल्पसंख्यांक निधी सुधार योजने अंतर्गत कामासाठी आ. रणजित सिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली 75 लाखाची मागणी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अल्पसंख्यांक निधी सुधार योजना सन 2022/ 23 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात विकास कामांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण 75 लाख रुपये निधीची मागणी निवेदनाद्वारे केली असून त्यामध्ये

1)अकलूज येथील महाळुंग रोड तांबोळी वसाहत येथे रस्त्यासाठी 20 लाख रुपये 2) नातेपुते येतील शाही मस्जिद आवारामध्ये शादीखाना बांधकामासाठी 10 लाख रुपये 3) पिलीव येथील मुस्लिम दफनभूमीचे वॉल कंपाऊंड बांधकामासाठी 10 लाख रुपये 4) संग्राम नगर येथील तांबोळी वसाहतीमध्ये रस्ते कामासाठी 20 लाख रुपये तर 5) यशवंतनगर येथील सुमित्रा नगर मधील मुस्लिम वसाहतीत रस्ता व गटार करण्यासाठी 15 लाख रुपयाची असे एकूण 75 लाख रुपयाची मागणी केली असून त्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत कार्यवाही करण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button