लोकनेते रामशेठ ठाकूर कला महाविद्यालयात 56 वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव 2023-24 रोजी पार पडणार.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित 56 वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव-2023-24 चे आयोजन रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे करण्यात आले आहे.
या युवा महोत्सवाचे उदघाटन लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर (चेअरमन,महाविद्यालय विकास समिती व सदस्य मॅनेजिंग कौन्सिल , रयत शिक्षण संस्था सातारा) यांच्या शुभहस्ते होणार आहे. अध्यक्षपदी अँड. शिंदे (व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा) उपस्थित राहणार आहेत. माननीय सुनील पाटील(संचालक विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ), निलेश सावे (सांस्कृतिक समन्वयक, युवक महोत्सव विभाग , मुंबई विद्यापीठ) डॉ. जयश्री कवठेकर( पालघर झोन समन्वयक) , डॉ. प्रकाश धुमाळ( पालघर झोन सह समन्वयक) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न होणार आहे. या युवा महोत्सवात ठाणे व पालघर ग्रामीण विभागातील महाविद्यालयाये सहभागी होणार असून ह्यात विविध 23 प्रकारच्या स्पर्धा प्रकारातून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनात मोखाडा महाविद्यालयाने (3.43CGPA) गुणांसहित A+ श्रेणी मिळवून नवा इतिहास घडवला आहे. अशातच मुंबई विद्यापीठाचे युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी मोखाडा महाविद्यालयास सोपविली आहे. हा एक गौरवाचा क्षण आहे. युवा महोत्सव आयोजनाची तयारी जोरात सुरु आहे व या युवा महोत्सवाचे आयोजन महाविद्यालय यशस्वीरित्या पार पाडेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी व्यक्त केला.



