शहर

पालघर सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर गुलाले यांचे निधन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर वनसिंग गुलाले (52) यांचे रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी विरार मनवेल पाडा येथील रेडियंट या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

डॉक्टर किशोर गुलाले हे गेल्या 16 वर्षापासून सफाळे प्राथमिक आरोग्य कार्यरत होते. 2021 रोजी त्यांची बदली पालघर जिल्ह्यातील सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती.या आरोग्य केंद्रात गेल्या दोन वर्षापासून ते आरोग्य सेवा देत होते. ही आरोग्य सेवा देत असताना त्यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचारासाठी पालघर येथील ढवळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

परंतु या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी विरार येथे पाठवले होते. विरार मनवेल पाडा येथील रेडियंट या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या डोक्यातील मेंदूचा रक्तस्त्राव अचानक बंद झाल्यामुळे डॉक्टर किशोर गुलाले यांचे रविवार दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button