धनगर सोशल ऑर्गनायझेशन (धनगर जोडो अभियान) च्या राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य पदी सर्वज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची निवड

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
धनगर सोशल ऑर्गनायझेशन (धनगर जोडो अभियान )च्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी साप्ताहिक अकलूज वैभव चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची निवड केल्याचे पत्र धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे व सचिव अजय गाढवे यांनी दिले असून या निवडीला उत्तर देताना भाग्यवंत नायकुडे म्हणाले की, संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय धोरणे समाजातील सर्वसामान्यां पर्यंत पोहोचविण्यासाठी मी सदैव तत्पर राहुन समाजासाठी कार्य करीन अशी ग्वाही त्यांनी दिली. या निवडीबाबत धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष- बबनराव आटोळे, उपाध्यक्ष -विशाल पोले. कार्याध्यक्ष -व्यंकटेश चामनर, सचिव -अजय गाढवे ,खजिनदार- रघुनाथ कुवर ,आदि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सर्व स्तरातून पत्रकार नायकुडे यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक नौशाद मुलाणी, उपसंपादक हुसेन मुलाणी यांनी टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनल परिवाराच्यावतीने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



