मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर…. पण वसुली बेकायदेशीर असे का ? :- संजय (बापु) घोलप
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील व शहरातील गुरजु शेतकरी कामगार कष्टकरी महिला नागरीक आपल्या गरजेपोटी लवकर किरकोळ कर्ज मिळते म्हणून मायक्रो फाईनान्स चे कर्ज घेतात त्यांना कर्ज देताना त्यांचे सिबिल असेल ईतर आधार कार्ड पॅन कार्ड चेक घेऊनच त्यांची कर्ज फेडण्याची पत बघूनच कर्ज दिले जाते
परंतु काही आडचणी कर्ज फेडण्यासाठी आल्यास यांचे आठवडा हप्ता एकदा जरी मागे पडला तरी मायक्रो फाईनान्स चे नेमलेले व्यक्ती (कर्मचारी ) कर्जदाराच्या घरी जाऊन बसतात व त्यांना कर्जाचे थकीत हप्ते लगेच आत्ताच्या आत्ता भरा कुठुन पण पैसे आणा शनिवार रविवार सुट्टी च्या दिवशी पण वसुली जोरदार चालु असते तो पर्यंत घरातुन जाणार नाही लगेच भरण्यासाठी दमबाजी ,वेडेवाकडे बोलतात त्यात घरी महिला वर्ग असेल तर अश्लील भाषेत पण बोलून अपमानास्पद बोलतात अशी तक्रार वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष करमाळा संजय (बापु) घोलप यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांकडे येत आहेत
तरी यावर मा.जिल्हाधिकारी सोलापूर तहसीलदार , पोलीस निरीक्षक करमाळा , साहाय्यक निबंधक यांच्या कडे तक्रार देणार आहोत व असे कर्मचारी करत असतील तरं त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे जर कर्ज वाटप कायदेशीर होत असेल तर कर्ज वसुली बेकायदेशीर का? ते पण कायदेशीर व्हावी जर हे असेच चालु राहिले तरं कर्जदारांना अपमान सहन न झाल्यास आत्महत्या सारखे गंभीर विचार मनात येऊ शकतात कारण नागरीक कर्जदारांना जीवनात अनेक अडचणी असतात कर्जदाराच्या घरी कोणी गंभीर आजारी असते कोणाच्या घरी लग्न कार्य असते प्रत्येकाच्या अनेक अडचणी असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने संमधीत मायक्रो फाईनान्स ला सांगु इच्छितो कि हे तत्काळ बंद करून कायदेशीर मार्गानेच जशी कर्ज वाटप करता त्याच मार्गाने कायदेशीर कर्ज वसुली करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने त्रीव आंदोलन उभा करावे लागेल हे लक्षात ठेवावे…