महाराष्ट्र

श.मो.पा.कृषी उत्पन्न बाजार समिती दुय्यम कार्यालय नातेपुते यांनी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या जागा वाटप रद्द करण्याची मागणी.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

सदर विषयी योद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे यांच्या वतीने दि.१८/६/२०२४ रोजी तक्रारी निवेदन देण्यात आले होते सन २०२४ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असतो.

तदप्रसंगी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मालकी हक्काच्या जागा छोटे-मोठे स्थानिक लघुउद्योजक व व्यापारी भाडे तत्त्वावर घेत असतात व त्या ठिकाणी व्यापार करत असतात. सदर जागे संबंधी कृषी उत्पन्न बाजार समितीने या जागा भाड्याने देण्याचे अधिकार नातेपुते येथील स्थानिक पुढाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना दिले आहेत.व हे पुढारी मनमानी कारभार करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून अतिरिक्त पैसा घेऊन खिसे भरत आहेत. हे लोक दरवर्षी आपल्या जवळच्या लोकांना जागा देत आहेत व इतर अर्जदारांना व्यक्तिगत विरोधातून दुजाभाव करून जातिवाद करत आहेत.असे स्थानिक लोकांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे…

सदर प्रकरणी उपसभापती बापू पांढरे हे पदाचा गैर वापर करून आपल्या जवळच्या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा देत आहेत व इतर अर्जदारांना व्यक्तिगत वादातून राजकीय विरोधक आहेत म्हणून डावलत आहेत.नातेपुते येथील स्थानिक पुढारी नेते मंडळी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामात हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नाही सध्या त्यांनी जागावाटप केले आहे ते ठराव बरखास्त करून शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांनी तेथील जागा खुल्या लिलाव पद्धतीने वाटप कराव्यात सदर मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक २०/६/२०२४ रोजी नातेपुते येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता

त्या प्रसंगी आज दि.२०/६/२०२४ रोजी केलेल्या जागावाटप निर्णय घेऊन रद्द करणार असल्याचे कार्यालयाकडून लेखी पत्र मिळाले म्हणून आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे तरी येत्या पाच दिवसाच्या आत कार्यालयाने आपला निर्णय दिला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे असा इशारा योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला. त्यावेळी योगेश लांडगे , प्रमोद लांडगे, श्री लांडगे, अशोक डबडे,समीर लांडगे,अमित लांडगे,गोट्या खुडे, आप्पा लांडगे, बाबा लांडगे,माऊली लांडगे,दर्शन माने ,नंदू नलवडे, मोन्या खेडकर इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button