सफाळे जलसार मेघराज डोंगराच्या जंगलात सापडला पुरुष जातीचा कुजलेला मृतदेह
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील सफाळे जलसार ग्रामपंचायत हद्दीतील मेघराज डोंगराच्या जंगलात एका अज्ञात इसमाचा कुजलेला मृतदेह सफाळे पोलिसांच्या हाती रविवारी संध्याकाळी सापडला आहे.
सफाळे पश्चिम भागातील जलसार ग्रामपंचायत हद्दीत मेघराज डोंगराचे घनदाट जंगल आहे.
या जंगलात रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यामुळे जलसार गावातील ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी ही आग विझवण्यासाठी जंगलात गेले असताना त्यांना एका अज्ञात इसमाचा कुजलेला पुरुष जातीचा मृतदेह दिसून आला याबाबत वन अधिकाराच्या कर्मचाऱ्यांनी केळवा सागरी पोलिसांना माहिती दिली असून घटनास्थळी केळवा सागरी पोलिसांनी भेट दिली असून याबाबत अधिक तपास केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा पोलीस करीत आहेत.