शहर

पालघर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक पदी दादाराम करांडे यांची वर्णी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक. :7030516640

पालघर जिल्हा अँटी करप्शन विभाग पदी पोलीस उपअधीक्षक दादाराम सुभाष करांडे यांची महाराष्ट्र पोलीस खात्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
आधी या पदावर असणारे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांची आतंकवाद विरोधी स्कॉट मुंबई येथे बदली झाली आहे.

तर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांनी बीएससी एग्रीकल्चर कृषी महाविद्यालय पुणे इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 20 वर्षाच्या शासकीय कारकीर्द शिक्षणानंतर 2004 ते 2008 या कालावधी ते सहाय्यक कृषी अधिकारी वाई जिल्हा सातारा येथे कार्यरत होते.
2010 रोजी MPSC मधून त्यांची पीएसआय पदी निवड झाल्यानंतर 2010 ते 2013 पर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते.तर 2013 ते 2020 नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आणि 2020 ते 2024 पर्यंत पोलीस ठाणे आयुक्तालयात कर्तव्य बजावत असताना पोलीस खात्यातील उत्तम कामगिरी म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्याकडून त्यांना सीनियर पोलीस पद बहाल करण्यात आले नंतर पोलीस खात्यामध्ये कर्तव्यदक्ष इमानदार अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्यावर नोव्हेंबर 2024 पासून ते अँटी करप्शन विभाग मुंबई येथे कार्यरत असताना महाराष्ट्र पोलीस खात्याकडून 28 मे 2025 पासून त्यांची नियुक्ती पालघर जिल्हा अँटी करप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button