शहर

डहाणू केटी नगर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर किरीट सोमय्या यांच्या विरोधात डहाणू शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने उग्र निर्देशने करून जाहीर निषेध व्यक्त..

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

डहाणू शहर व तालुका महिला आघाडीच्या वतीने गुरूवार, दिनांक 20 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या विरोधात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय केटी नगर, डहाणू रोड, (पश्चिम) येथे डहाणूतील कडवट, कट्टर , निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने भगवे झेंडे दाखवत उग्र निर्देशने करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी कार्यसम्राट शहरप्रमुख संजय पाटील, उपशहरप्रमुख प्रदीप लिमये , ड्याशींग शिवसेना शहर प्रमुख (अल्पसंख्याक विभाग)वसीम पठाण,
प्रविण मिस्त्री ,माजी शहरप्रमुख विश्वास निकम ,माजी महिला तालुका संघटक, रणरागिणी सौ. उज्वला डामसे ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी काकडे , महेश राऊत, महिला आघाडीच्या सना वसीम पठाण व डहाणू भागातील समस्त शिवसैनिक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या जाहीर निषेध व शिवसैनिकांच्या उग्र निर्देशन प्रसंगी महिला आघाडी व युवासैनिक रूचीत आणि कुणाल यांनी यांनी देखील सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button