महाराष्ट्र

गणेश मित्र मंडळ दगडी चाळ,विक्रमगड तर्फे पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप

विक्रमगड (ठाणे जिल्हा प्रतिनिधी ): राजेंद्र भगवान भोईर (मो.९२०९८६९८३०)

विक्रमगड शहरातील “गणेश मित्र मंडळ “दगडी चाळ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अकरा दिवस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मंडळाने केले असुन प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक , सामाजिक तसेच मनोरंजनात्क कार्यक्रमाचे आयोजन गणेश मित्र मंडळ दगडीचाळ करत असते, यात महिलांसाठी, लहान मुला-मुलींसाठी विविध खेळ, नृत्य , वेशभुषा असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे केले जाते.

त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असे समाज उपयोगी उपक्रम देखील मंडळाकडून केले जाते. अहोरात्र समाजाचे व आपले रक्षण करणारे आपलं पोलिस प्रशासन यांच्या सुरक्षेसाठी विक्रमगड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना मंडळाकडून सुरक्षा साहित्य वाटप कराण्यात आले.

यावेळी विक्रमगड तालुक्याच्या तहसीलदार चारूशीला पवार मॕडम , विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.रविंद्र पारखे साहेब , गणेश मित्र मंडळ कमिटीचे अध्यक्ष – विशाल जि. पटेल , कार्याध्यक्ष – श्री.राकेश पुरोहित, सचिव- कुलदीप विष्णू सांबर ,उपाध्यक्ष – पार्थ नरेंद्र पटेल, जय लक्ष्मीकांत बागुल तसेच सर्व महिला सदस्य या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मंडळाकडून सुरक्षा साहित्य दिल्याबद्दल विक्रमगड पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी गणेश मित्र मंडळ , दगडीचाळ विक्रमगड चे धन्यवाद मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button