महाराष्ट्र

अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विषयाच्या सन २००७ या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या सण २००७ च्या बॅचचा स्नेहमेळावा रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी संपन्न झाला याप्रसंगी २० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी प्रशांत मदने-पाटील, युवराज घुले, रामचंद्र साबळे, पंकज पोतदार, प्रकाश धाइंजे, सुभाष रणदिवे या विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करून आपल्या आठवणींना उजाळा देत २००६-०७ च्या काळातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या शिक्षकांबद्दल आदराची भावना व्यक्त करून त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे सांगितले.

तसेच या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व मित्र मैत्रीण तब्बल सोळा वर्षानंतर एकत्र आल्याने त्यांचा आनंद व्दिगुणित झाला होता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसंडून वाहत होता शिवाय सर्वांनी एकमेकांच्या बद्दल विचारपूस करत विचाराची देवाणघेवाण करत होते.या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रामलिंग सावळजकर यांना आमंत्रित करून त्यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रा. सावळजकर यांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांनी गलांडे हॉटेल येथे येथेच्छ स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमासाठी जयराज माने-पाटील, सागर मोहिते, हेमंत सावंत, दत्ता लाटे, नितीन उपासे, हर्षदा माने-पाटील, ऋजुता जगताप, पल्लवी रणवरे, जिनत पठाण, नुजत पठाण, देवयानी लंगडे हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात शेवटी प्रिया सातपुते यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button