रामचंद्र लक्ष्मण साठे यांचा “समाज भुषण” पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरव…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती नवी दिल्ली येथे सालाबाद प्रमाणे झालेल्या 05/8/2025 रोजी समितीच्या वतीने अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील आपले आयुष्य समाज सेवेसाठी अर्पित केलेले…
मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथील मेहरबान हायकोर्टात स्वतंत्र आरक्षण मिळावी म्हणून जनहित याचिका दाखल केलले आणि अकलूज येथील गोरगरीब जनतेस घर जागा मिळवून देणारे व त्यांच्या सुखदुःखात सामील होणारे रामचंद्र लक्ष्मण साठे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते “समाज भूषण” पुरस्काराने गौरवण्यात आले…
या वेळी रामचंद्र लक्ष्मण साठे यांनी अण्णाभाऊ साठे जयंती समिती कार्यक्रमाचे आयोजक समिती नवी दिल्ली यांचे आभार व्यक्त केले,रामचंद्र लक्ष्मण साठे यांना गौरविण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत साठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला…



