मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आंदोलनास पाठिंबा.

माळीनगर.. प्रतिनिधी रियाज- मुलाणी मो.9921500780
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील केलेल्या लाटी हल्ल्याचा आंदोलकांनी रस्ता रोको करत निषेध केला राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनाच्या निषेधार्थ माळीनगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत असताना त्यांच्यावर लाटी हल्ला केला जातो हे अमानुष्य कृत्य आहे .सरकार हे बहुजनांचे नाही हे नेहमी असे कृत्य करतात याचा आम्ही जाहीर निषेध करतो मराठा बांधवांच्या बंद मध्ये आम्ही माळीनगर मधील सर्व वंचित बहुजन आघाडी सामील आहोत आमचा आपणास जाहीर पाठिंबा आहे.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माळीनगर शहराध्यक्ष शकील भाई शेख, उपाध्यक्ष नागनाथ शिंदे, नवनाथ वजाळे, उमेश जगताप, अण्णा माने, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते