.राजेंद्र तिवारी यांची महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन सहसचिव पदावर निवड तर…अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संजय सोहोनी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेंद्र तिवारी हे महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल अससिएशनच्या कार्यकारिणीवर सहसचिव म्हणून निवडून आले आहेत.अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. पालघर जिल्ह्यामधून या पदावर निवडून आलेले ते पहिलेच डॉक्टर असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांवर अभिनंदन होत आहे.तसेच डहाणू येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ संजय सोहोनी यांना महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . गतवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन डहाणूचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी राबवलेल्या योजनांचे यावेळी कौतुक करण्यात आले. रिक्षाचालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याच्या डहाणू पॅटर्नने अमरावतीच्या वार्षिक अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.डहाणू मधील डॉक्टर्स उत्कृष्ट वैद्यकीय सेवा तर देतच आहेत. पण त्याबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन डहाणूच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे. डॉ. मकरंद बापट, डॉ.ज्योती बापट, डॉ. पूनावाला, डॉ.अत्तार यांनी केलेल्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली. आमचा गौरव हे आई एम ए डहाणूच्या सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे अशी प्रतिक्रिया डॉ. सोहोनी आणि डॉ तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.



