महाराष्ट्र

तांबे ,कॉपर, इतर तारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह करमाळा पोलिसांनी केले जेरबंद.करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी….

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये मागील काही महिन्यापासून कॉपर वायर दुकानांचे शटर उचकटून वायर,तसेच मोटर वायर यांची वारंवार चोरी घडत असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रिमत यावलकर उपविभागीय अधिकारी श्री.अजित पाटील करमाळा पोलीस निरीक्षक श्री.विनोद घुगे यांनी कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पथक तयार केले.यामध्ये पो.हे. कॉ.श्री. अजित उबाळे व त्यांचे पथक तपास करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की कॉपर,तांबे यांचे चोरी करणारी टोळी बारामती, दौंड,तसेच औरंगाबाद येथील शहरामध्ये कार्यरत असून ही टोळी सोलापूर जिल्ह्यात येत असे.

या यावरून करमाळा पोलीस ठाणे हद्दित कंदर याठिकाणी ईश्वरी हॉटेल येथे थांबलो असता तेथे एक इसम पाटीवर सॅक घेऊन उभा असल्याचं दिसल.तेव्हा त्याचा संशय आल्याने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने उडवा उडविची उत्तरे देऊ लागल्याने त्याच्याकडील सॅक तपासली असता त्यामध्ये दोन स्क्रू ड्रायवर, कटर, कटावनी वैगेरे संशयित साहित्य मिळून आले. त्याचा ठोस कौशल्य पूर्ण तपास केल्यावर त्याने बारामती,पुणे, दौंड औरंगाबाद ,सोलापूर अशा ठिकाणी काही साथी दरासोबत जाऊन कॉपर चे दुकान शटर उचकटून कॉपर वायर बंडल,केबल बंडल अशा मालाची चोरी केली.

त्यांचेकडून ४७२किलोच्या वजनाचे तांबेची तार एकूण ४,२४,८००रु.एवढी रक्कमेची चोरी केलेल्या मुद्देमालासह आरोपीस अटक करून त्यांच्यावर विविध प्रकारे कलम लावण्यात आले.सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रिमत यावलकर उपविभागीय अधिकारी श्री.अजित पाटील करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को. अजित उबाळे पो.ना.,वैभव ठेंगल पो.को.अर्जुन गोसावी पो.को.,तोफिक काझी ,सोमनाथ जगताप , ज्ञानेश्वर घोंगडे, रविराज गटकुळ , गणेश शिंदे सौदागर ताकभाते तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पो.ना.व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button