महाराष्ट्र

प्रसिद्ध कवी ना.धों. महानोर ( रानकवी )यांचं निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध कवी, गीतकार ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी ना. धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ना. धों. महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे.
नामदेव धोंडो महानोर हे ना.धों. महानोर यांचं संपूर्ण नाव. ते मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील. कन्नड तालुक्यातील पळसखेडा 16 सप्टेंबर 1942 गावात त्यांचा जन्म झाला. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी इथं त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिलं वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला अन् पुन्हा गाव गाठला. पण तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला अन् महाराष्ट्राला मिळाला ‘रानकवी’!
ना.धों. महानोर यांचा लेखनी जेव्हा चालायची तेव्हा खुद्द निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली. ना.धों. यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क च्या वतीने” भावपूर्ण श्रद्धांजली”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
23:25