पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी.
उपसंपादक —— -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ——97 30 867 448
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मात्र नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित आहेत.
यावेळी मंचावर एक वेगळाच प्रसंग जनतेला पाहायला मिळाला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा एस पी कॉलेज मैदानाकडे निघाला. कार्यक्रमाच्या मंचावर नरेंद्र मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहत मोदींचे स्वागत केले. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्वांना अभिवादन करत नरेंद्र मोदी हे जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा शरद पवारांनी हस्तांदोलन करत मोदींचे स्वागत केले. यावेळी काही क्षण दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि शरद पवारांनी हसून नरेंद्र मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य दिसून आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली या प्रश्नावर आता चर्चा घडू लागक्या आहेत.