केळवे गावात गटाराचा प्रश्न ऐरणीवर..अवकाळी पावसाचे पाणी गटारा बाहेर नागरिक हैराण..

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा
केळवे गावातील नागरिकांच्या दळण वळणाच्या दृष्टीने अति महत्वाचा असलेला केळवे गावातील केळवे बाजार बस स्टॉप ते केळवे जोगाळे दरम्यानचा मुख्य रस्ता नव्याने बनवण्यात आला त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्त्याची उंची मूळ रस्त्यापासून जवळपास दीड फुटाने वाढवण्यात आली आहे रस्त्याच्या दुतर्फा गटारांची व्यवस्था नसल्या मुळे मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी पहाटे पडलेल्या अवकाळी पावसामुळे केळवे बाजार बस स्टॉप परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.अवकाळी पडलेल्या काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर जवळपास एक फूट भर पाणी साचले आहे.

बाजार बस स्टॉप पासून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा (अंदाजे 100 मीटर लांबी असलेल्या दोन) काँक्रीट गटाराची मागणी गेली अनेक वर्षापासून प्रशासनाकडे करण्यात येत असून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर वर्षी पावसाळ्यात ह्या रस्त्या दरम्यान गुडघाभर पाणी साचते त्यातून प्रवासी कसा बसा प्रवास करतात
पण नवीन रस्ता बनवताना त्याचे काँक्रीट करणं झाल्याने वाढलेल्या उंची मुळे येत्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर रस्त्याच्या दुतर्फा काँक्रीट गटारांची व्यवस्था झाली नाही तर काही मिनिटे कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे तर संपूर्ण पावसाळ्यात रस्त्याची अवस्था काय होईल आणि नागरिकांची आणि प्रवाश्यांनी हालत काय होईल त्यांना प्रवास करताना या समस्येचा सामना पूर्ण पावसाळा करावा लागेल ह्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे ह्या वर गंभीर प्रश्न बाबत प्रशासनाने लवकरात लवकर लक्षवेधून रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूस काँक्रीट गटार बनवण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या मार्फत करण्यात येत आहे.



