सामाजिक

ख्रिश्चन धर्माचे महत्त्व पटवून देऊन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या काही महिला पुरुषांना माकणे व वाढीव गावातील नागरिकांनी दिले हाकलून

पालघर जिल्हा

प्रतिनिधी विजय घरत

भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे माकणे ग्रामपंचायत हद्दीत सफाळे भागातील हिंदू नागरिकांना एकत्र करून येशूची पूजा प्रार्थना करायला लावणाऱ्या व ख्रिश्चन धर्माचे हिंदूंना महत्त्व पटवून देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या काही महिला पुरुषांना माकणे आणि वाढीव गावातील नागरिकांनी या गावातून शुक्रवारी दुपारी हाकलून लावले आहे. येशूला मानणारे हे लोक रात्री अपरात्री माकणे गावातील कामधेनू बिल्डिंगच्या बाजूला तंबू ठोकलेल्या एका जागेत या भागातील नागरिकांना एकत्र करून पूजा अर्चना करत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी सर्व गावकऱ्यांनी मिळून रात्री अपरात्री पूजा अर्चना करून हिंदूंना ख्रिश्चन धर्माचे महत्त्व पटवून देणाऱ्या व हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना गावातून हाकलून दिले आहे. हे सर्व लोक दुसऱ्या गावातील होते तसेच या ठिकाणी चर्च किंवा मंदिर नसताना देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची परवानगी न घेता आचारसंहितेचा भंग करून लोकांना एकत्र करणे गुन्हा असताना देखील माकणे आणि वाढीव गावात असे प्रकार घडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button