लोकशाही व संविधान वाचवायचे असेल तर राज्याला व देशाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही गोपाळ काका देशमुख

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
भारताचे संविधान व लोकशाही वाचवायचे असेल तर ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही असे मत वंचित बहुजन आघाडी चे माढा लोकसभेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ काका देशमुख यांनी इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले

प्रारंभी सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्या हस्ते इस्लामपूर येथील वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन सरवदे ,माढा लोकसभेचे जिल्हा कोषाध्यक्ष -अभिमान जगताप, युवा उपाध्यक्ष -विकास कांबळे, तालुकाध्यक्ष -दर्शन सुरवसे, तालुका महासचिव -विकास नलवडे ,जिल्हा उपाध्यक्ष -पांडुरंग केंगार ,रणजीत गायकवाड ,माढा तालुका युवा अध्यक्षर राजेंद्र लोंढे, माढ्याचे महासचिव अण्णा वाघमारे ,आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना पुढे गोपाळ काका देशमुख म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर हे चारित्र्यसंपन्न व कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले एकमेव नेते असून ते संविधानाचे रक्षण कर्ते आहेत आगामी 2024 च्या निवडणुकीला सर्व वंचित व बहुजन घटकांना वंचित बहुजन आघाडी मध्ये सहभागी करण्याचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मानस असून आगामी काळात हिंदू मुस्लिम जातीय दंगली रोखायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नसुन सर्व घटकांना न्याय देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी असल्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या संख्येने या पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे सर्व बहुजनांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे काळाची गरज असुन परवाच औरंगजेब यांच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रात वातावरण गडुळ करण्याचा प्रयत्न केला माञ ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब यांच्या कबरी वर जाऊन पुष्प वाहिल्या नंतर वातावरण निवळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले .
