महाराष्ट्र

महाराष्ट्राचे हरित क्रान्ती ‘ व श्वते क्रान्तीचे जनक – अँड डॉ वसंतराव नाईक

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्राचे हरित क्रांन्ती व श्वेत क्रांन्तीचे जनक अँड डॉ मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस १जुलै कृषि दिन म्हणून साजरा केला जातो . श्री वसंतराव फुलसिग नाईक ( राठोड ) यांचा जन्म १ जूलै १९१३ रोजी गहूली ता – पुसद जिल्हा -यवतमाळ येथे एका शेतकरी कुटूबात झाला . पहिल्यापासून संघटना कौशल्य कृषि क्षेत्राची आवड असलेला सर्वसमान्य माणुस शेती शेती व शेतकरी बाबत असामान्य तळमळ व त्या संबंधी कार्य यामुळे कृषि कान्तीचे जनक झाले .

महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा (४ )- सलग१२ वर्षे मुख्यमंत्री राहिले . मध्यप्रदेश चे पाहिले उपमहसुल मंत्री महाराष्ट्राचे पहिले महसुल मंत्रीचा मान त्याचेकडे आहे. राज्य केंद्रीय बॅकेचे संचालक ‘ पुसद शेतकरी मंडळाचे पहिले अध्यक्षचा मान मिळविला.कृषिक्षेत्र – कृषि क्षेत्रात _ कापुस एकाधिकार योजना ‘ कृषि उत्पन बाजार समिती जनक, विनोबा भावे यांची भुदान चळवळ . दुग्ध व्यवसाय चालना देणे साठी गाई व म्हैस कर्ज ‘ विविध फळपिके संशोधन व विकास ‘ कृषि विद्यापीठ स्थापना . पाणी आडवा पाणी जिरा उद्‌गाते ‘ वसंत बंधारे व पाझर तलावाचे जनक कृषि मंडळे स्थापना इत्याची अद्वितीय काम त्यानी केले व १९६५ साली येत्या २ वर्षात माझे राज्य स्वयंपूर्ण नाही झाले तर झाडाला मी स्वतः लटकवीन अशी शनिवार वाडा येथे जाहिर घोषणा करणारे मुख्यमंत्री होते .

त्यांनी अन्नधान्य स्वयपूर्णता करून दाखविले असा हा महान शेतक्याचा कैवारी पाठीराखा नेता होऊन गेला . राज्यातील दारूबदी उटवून शासनाचा महसुल वाढविला व दारु भेसळ पासून बचाव केला . रोजगार हमी योजना या मुहर्तमेढ रोवून१९७२ दुष्काळ पडला त्यावेळी ५० लाख लोकांना रोजगार हमी योजना अंतर्गत काम देऊन अन्नधान्य पुरवठा करून भुकबळी पासून जनतेचे संरक्षण केले . महाराष्ट्रात देशातील प्रथमतः त्रिस्तरीय पचायत राजचा उदगम करून सत्तेचे विक्रेंद्रीकरण केले व जनतेच्या हती सोपावून ‘ प्रवाहात कार्यप्रणालीत आणण्याचे काम त्यांनी केले . अशा ह्या महान जानता राजा ‘ शेतकर्यांचा कैवारी ‘हरितक्रांती ‘ श्वेतक्रांन्ती चे जनक सहकार चा मुहर्तमेढ रोवणाऱ्या कृषि संशोधन केंद व विद्यापीठ जनक राजनिती तज्ञ व कृषितज्ञ यांचा त्याचे १ जुलै जन्मदिवस कृषि दिन म्हणून साजरा करून मानाचा मुजरा करून त्याचे रुणी राहून जन्मदिनाचे विनम्र अभिवादन !!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
05:58