क्राईम

वसई विरार महानगरपालिका सातीवली कार्यालयातील लिपिक दिलीप लोखंडे लाच स्वीकारताना ठाणे पोलीस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

जमीन मालकाच्या जागेवर अवैधरित्या कब्जा करून या जागेतील झाडे तोडणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी जमीन मालकाकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या सातिवली कार्यालयातील लिपिकाला अँटी करप्शन विभाग ठाणे यांच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी रंगेहात अटक करून त्यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यादव यांच्या जागेवर अधिक अतिक्रमण करून राठोड नावाच्या इसमाने त्या जागेतील झाडे तोडून टाकली होती.

याबाबत यादव यांनी सातीवली कार्यालयामध्ये राठोड यांची तक्रार केली होती. या राठोड नावाचा इसमावर कारवाई करून त्यांना नोटीस देण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या सातिवली कार्यालयातील लिपिक दिलीप लक्ष्मण लोखंडे वय वर्ष 52 यांनी यादव यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.म्हणून यादव यांनी या लिपिकाची लेखी तक्रार अँटी करप्शन कार्यालय ठाणे विभागात केली होती.

या तक्रारची पडताळणी करून शिवराज पाटील पोलीस निरीक्षक अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र, तसेच अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष नावलगी अँटी करप्शन ठाणे विभाग यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी संध्याकाळी 5.20 वाजता सापळा रचून दिलीप लोखंडे ( लिपिक )यांना यादव यांच्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष वसई विरार महानगरपालिकेच्या सातिवली कार्यालयात रंगेहात अटक करून त्यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button