विशेष

वंचित बहुजन आघाडी शाखेचे जांबुड 14 सेक्शन येथे राहुल चव्हाण सर व विजय भाऊ कोकणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

टार्डम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

माळशिरस :वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने गाव तिथं वंचित ची शाखा.घर तिथं वंचित चा कार्यकर्ता हे ध्येय डोळया समोर ठेऊन मौजे जांबुड सेक्शन १४ तालुका माळशिरस येथे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर

सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय भाऊ कोकणे उपमहाराष्ट्र केसरी पै.सादिक भाई पठाण,पुण्याचे उद्योजक विनोद भाऊ साळुंखे, माळशिरस तालुक्‍यातील युवा नेतृत्व अण्णासाहेब निचळ, विशाल कसबे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या शुभहस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले.यावेळी जांबुड सेक्शन १४ ग्रामशाखेचे अध्यक्ष विजय भोसले, उपाध्यक्ष अनिल जाधव, सचिव दादा खरात, खजिनदार शंकर घोडके, कार्याध्यक्ष संतोष भोसले. संपर्क प्रमुख राजकुमार भोसले व 14 सेक्शन पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर ,उपाध्यक्ष विजय भाऊ कोकणे ,महासचीव विशाल निवगिरे,माढा तालुका उपाध्यक्ष विनोद एक्का सोनवणे,कु्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के,माढा तालुका अध्यक्ष महादेव साबळे,पंढरपूर तालुका ९ प्रसिद्धी प्रमुख अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा, सर्व वंचित बहुजनांसाठी व आपल्या हक्कासाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना डोळ्या समोर ठेऊन गावातील सर्व समस्येंवर आवाज उठवून कामे मार्गे लावा अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका ठेवा. व घरोघरी वंचीत बहुजन आघाडीचा विचार पोहचवा असे मार्गदर्शन करून त्या सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यथोचित असा सन्मान करुन वंचित बहुजन आघाडीच्या परिवारामध्ये स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग केंगार,जिल्हा उपाध्यक्ष नौशाद चिखलकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू वाघमारे, बाळासाहेब गायकवाड,सुरेश मोटे, योगेश गायकवाड,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे,राजेंद्र गायकवाड,शांतीलाल साळवे तसेच माळशिरस तालुक्‍यातील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मोटे, योगेश गायकवाड,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे,राजेंद्र गायकवाड,शांतीलाल साळवे तसेच माळशिरस तालुक्‍यातील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button