शहर

विरार महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे अर्नाळा येथील 25 वर्षीय युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू… तर अन्य 3 जण जबरी जखमी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

विरार येथील महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्यामुळे यापैकी एका कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन कर्मचाऱ्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
ही घटना विरार अर्नाळा धसपाडा येथे शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता घडली आहे.
या घटनेमध्ये विरार अर्नाळा जांभूळपाडा येथील 25 वर्षीय जयेश घरत या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विरार महावितरण विभागाचे चार कर्मचारी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता धसपाडा येथील ट्रांसफार्मर वर काम करत असताना विजेचा विद्युत प्रवाह अचानकपणे चालू झाल्यामुळे या चार पैकी तीन जण शॉक लागून पोल वरून खाली पडले तर जयेश घरत याला जबरी शॉक लागल्यामुळे तो वर चिकटून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

जयेश घरत हा टेनिस क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटसाठी विरार वसई सह पालघर जिल्ह्यात एक प्रसिद्ध खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button