उमेश पवळ यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा नगर परिषद कामगार करमाळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्षपदी तर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जाधव यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याची संपूर्ण तालुका कार्यकारणी दि १७ / ३ / २०२४ रोजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर केली यामध्ये उमेश पवळ यांची करमाळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आणि अडचणी व प्रश्नासाठी तालुका कार्यकारणीची निवड करण्यात येत असते परंतु दिनांक ३/३/२०२४ रोजी रेस्ट हाऊस करमाळा येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बँक खाते शालेय अकाउंट मध्ये कन्व्हर्ट करणे हा महत्त्वाचा विषय असताना या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असे जाधव बोलताना म्हणाले करमाळा तालुका कार्यकारिणीचा वेगळा ग्रुप काढण्याच्या सूचना देण्यात आ लेल्या होत्या तो ग्रुप देखील काढण्यात आलेला नाही

तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वर्गणी बाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अनेक ग्रामपंचायत कर्मचारी माझ्या फोन पे वर वर्गणी पाठवू का विचारत असताना देखील तालुका कार्यकारणी कडे वर्गणी जमा करा असे उलट सांगावे लागत होते तरीही तालुक्यातील कार्यकारणी वर्गणी बाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले करमाळा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा ग्रामपंचात कर्मचाऱ्यांची नावे 2024 च्या जेष्ठता यादीत घालण्यासाठी माहिती संकलित करावी व त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत पाठवण्यासाठी एकाही कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली नाही किंवा माहिती घेण्यात आलेली नाही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनच्या पदावर काम करीत असताना इतर संघटनाचे मेसेज आपल्या ग्रुप वर जाणीवपूर्वक टाकून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आणि अडचणी व तक्रारीबाबत प्रथमता तालुका कार्यकारिणीने योग्य पद्धतीने नियोजन करून कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे परंतु गेल्या पंधरा दिवसापासून जेवढे कर्मचारी मिटींगला होते तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या तक्रारी संकलित झाल्या त्यांच्या तक्रारी वरिष्ठ कार्याकडे पाठवण्यात आल्या त्यानंतर मात्र तालुक्यातल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची तक्रार तालुका कार्यकारिणी संकलित केलेली नाही संघटनेचे पद घेऊन जाहिरातबाजी करून नाव मोठे करण्याचा प्रयत्न झाला पण गोरगरीब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी दुर्लक्ष केले गेले ही माझी खात्री झाल्याने करमाळा तालुक्याची कार्यकारणी माझ्या अधिकारात बरखास्त केलेली आहे नवीन कार्यकारणी निवड करेपर्यंत उमेश पवळ कुंभेज यांच्याकडे तालुक्याचा पदभार सोपविण्यात आलेला आहे मला गोरगरीब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने ते सहन झाले नाही म्हणून लवकरच नवीन कार्यकारणीची नियुक्ती करण्यात येणार आहे ज्या गोरगरीब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी तालुक्यात आपली निवड करण्यात येत असते त्याच पदाधिकाऱ्यांनी जर चुकीच्या पद्धतीने वागले तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही पद आज असते उद्या नसते पदाचा कधीच विचार करायचा नसतो जोपर्यंत आपण आपल्या तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापर्यंत वर्गणीसाठी नव्हे त्यांच्या तक्रारीसाठी त्यांच्या दारात जाऊन आपण काम केले तर त्यांचे काळीज मोठे होत असते माझं कोणीतरी काळजी करणारी माणसं आहेत हे त्याच्या मनात खूनगाट तयार होत असते म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच आत्ताच म नितीन जाधव कंदर यांचा मेसेज वाचला सर्वांनी मिळून मिसळून काम करण्याची माझी पद्धत आहे म्हणूनच आज पर्यंत प्रत्येक वागण्याकडे दुर्लक्ष केले तालुका कार्यकारणी बरखास्त केलेली आहे संघटनेतुन कोणालाही बाहेर काढलेलं नाही तालुकाध्यक्ष दादासाहेब निमगिरे यांनी तालुक्याच्या ग्रुप मधील सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते परंतु नव्याने उपाध्यक्षपदी नेमलेला सागर कुंभार हा तालुक्याचा मालक झाल्यासारखे त्याच्या वाटत होते त्याकडेही देखील दादासाहेब निमगिरे यांनी दुर्लक्ष केले ग्रुप वर त्यांना आवर घालण्याचे कामकाज केलेले नाही तरी नवीन कार्यकारणीची निवड करताना गोरगरीबासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्या मधुन करण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी बोलताना सांगितले जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ जाधव यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे राहणीमान भत्ता प्रायव्हेट फंड सेवा पुस्तक व रजा यासंदर्भात माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्या सोबत बैठक लावून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार व जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे उमेश पवळ अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना करमाळा तालुका



