महाळुंग येथील विठ्ठल मुर्ती पंढरपूर येथील मुळ मुर्ती असल्याचा दावा

बी.टी.शिवशरण
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल मुर्ती ही पंढरपूर येथील मुळ मुर्ती असल्याचा दावा जुन्या जाणत्या वयोवृद्ध नागरिकांनी केला आहे बादशहा औरंगझेब याने महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरातील मुर्त्या तोडफोड करुन मंदिरातील दागिने संपत्ती लुटून विध्वंस सुरू केला होता त्यावेळी पंढरपूर येथील मंदिरातील मुळ विठ्ठलाची मुर्तीला औरंगझेब याच्या सैन्याकडून धोका होऊ नये म्हणून सदर विठ्ठल मुर्ती सुरक्षेच्या कारणास्तव महाळुंग आणुन संरक्षण केल्याचे सांगण्यात येते
सदर विषय माहिती वाडवडिलांकडुन पुर्वजांनी सांगण्यात आली तीच माहिती विद्यमान नागरिक सांगतात यामध्ये तथ्य असे की पंढरपूर येथील विठ्ठल मुर्तीचा शाळीग्राम व येथील मुर्तीचा शाळीग्राम एकच आहे शेजारी रूक्मिणी मातेची मूर्ती नाही परंतु मुर्ती साठी चौथरा आहे अगोदर विठ्ठलाची मूर्ती आणली व नंतर रुक्मिणी मातेची मूर्ती आणण्याचा प्रयत्न असावा असे बोलले जाते या विठ्ठल मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा मुक्काम दरवर्षी असतो हे मंदिर सातशे वर्षांपूर्वी बांधलेलं असल्याची माहिती पुजारी सखारामपंत कुलकर्णी यांनी दिली

त्यांनी सांगितले की जे निराधार व वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी अन्नदान छत्र सुरू करण्याचा मंदिर देखभाल संघटनेचा मानस आहे संघटनेकडे जवळपास पंचावन्न लाख रुपये निधी उपलब्ध असुन सुरवातीला पंचवीस हजार रुपये पासुन सुरु केलेला मदतनिधी पंचावन्न लाख पर्यंत गेला आहे निराधार गरजू वृध्द लोकांसाठी काही खोल्या घेतल्या आहेत अजुन काही बांधण्याचा मनोदय असून तेथे त्यांची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
पंढरपूर येथील मुळ विठ्ठलाची मूर्ती माढा येथे असल्याचे सांगण्यात येते तेथे दरवर्षी आषाढी एकादशीला दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार सदर मुर्ती जवळपास सातशे ते आठशे वर्षांपूर्वी ची असल्याचे सांगण्यात येते सदर मुर्ती बाबत पुन्हा नव्याने संशोधन होणे गरजेचे आहे त्यामुळे त्यातुन यातील सत्यता समजू शकेल



